‘मोदींचं भाषण न ऐकणार्‍या विद्यार्थ्यांची यादी पाठवा’

September 4, 2014 4:21 PM0 commentsViews: 3678

pm modi 5 sep speech04 सप्टेंबर : शिक्षक दिनी अर्थात 5 सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं भाषण देशभरातील शाळांमध्ये ‘थेट लाईव्ह’ दाखवलं जाणार आहे आणि मोदींचं भाषण सर्व विद्यार्थांनी ऐकवाचं असा फर्मान सरकारने काढला आहे. आणि हा फर्मान पूर्ण करण्याचे कडक आदेश देण्यात आले आहे. सर्व शाळेमध्ये आता तयारी सुरू झाली असून गैरहजर राहणार्‍या आणि भाषण न ऐकणार्‍या विद्यार्थ्यांची यादीच पाठवा अशी सुचना करण्यात आलीय.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भाषण दाखवण्यासाठी देशभरातल्या शाळांमध्ये आता तयारी सुरू झाली आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सर्व राज्यांच्या शिक्षण सचिवांसाठी पत्रक जारी केलंय. पंतप्रधानांचं भाषण ऐकण्यासाठी सर्व शाळांनी पाच सप्टेंबरला आपल्या विद्यार्थ्यांना दुपारी अडीच ते पावणे पाचच्या दरम्यान एकत्र करण्याच्या सूचना यात करण्यात आल्या आहेत. इतकंच नाही तर जे विद्यार्थी हे भाषण ऐकणार आहेत, त्यांची यादीही शाळांकडून मागवण्यात आलीय. हे भाषण ऐकणं बंधनकारक नाही, असा दावा काही दिवसांपूर्वी मनुष्यबळ विकास मंत्री स्मृती इराणी यांनी केला होता. आता मात्र, या कार्यक्रमासाठी देशातल्या कुठल्याच खासगी शाळातून विरोध झालेला नाही, असा युक्तिवाद त्यांच्या मंत्रालयाकडून केला जातोय. दरम्यान, मोदींच्या भाषणाची सक्ती हा विषय नाही. हे भाषण ज्यांच्यासाठी आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचावं असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close