मनसेचं स्वप्न राहिलं अधुरंच

May 17, 2009 7:57 AM0 commentsViews: 2

17 मे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं मुंबई, ठाण्यात शिवसेना भाजपच्या उमेदवारांना पाडण्याचं काम केलं असलंतरी रजिस्टर्ड पार्टी होण्याचं मनसेचं स्वप्न मात्र अधुरंच राहिलं आहे. राज ठाकरेंचा मराठी बाणा यावेळी खात उघडणार असं वाटत होतं, पण कमी उमेदवार उभे करूनही त्यांना अपेक्षित यश मात्र मिळालं नाही. याचं करण होतं अनेक चिन्हं. पक्ष रजिस्टर करण्यासाठी राज ठाकरे यांना राज्यातल्या मतदानाच्या सहा टक्के मतं मिळवायची. त्यासाठी त्यांना किमान 22 लाख मतं आणि दोन खासदार हवे होते. पण मनसेला 9 लाख 88 हजार 359 मतं कमी पडली आहेत. मनसेनं महाराष्ट्रात 12 ठिकाणी उमेदवार उभे केले होते. त्यापैकी शिशिर शिंदे यांना ईशान्य मुंबईतून 1 लाख 95 हजार 148 मतं मिळाली आहेत. मनसेच्या 11 उमेदवारांमध्ये शिशिर शिंदे यांना सगळ्यात जास्त मतं मिळाली. त्या खालोखाल दक्षिण मुंबईतून बाळा नांदगावकर यांना 1 लाख 59 हजार 729मतं , उत्तर मुंबईतून शिरीष पारकरांना 1 लाख 47 हजार 502 मतं, राजन राजे यांना ठाण्यातून 1 लाख 34 हजार 840 मतं मिळाली आहेत. शिल्पा सरपोतदारांना उत्तर मध्य मुंबईतून 1 लाख 32 हजार 555, शालिनी ठाकरे यांना उत्तर-पश्चिम मुंबईमधनं 1 लाख 23 हजार 885 , तर दक्षिण -मध्य मुंबईतून श्वेता परूळेकर यांना 1 लाख 8 हजार 841 मतं मिळाली आहेत. डी. के. म्हात्रे यांना भिवंडी मतदारसंघातून 1 लाख 7 हजार 85 तर कल्याणमधून वैशाली दरेकर यांना 1 लाख 2 हजार 56 मतं पडली आहेत. अर्थात पहिल्याच फटक्यात किमान लाखभर मतं मनसेच्या प्रत्येक उमेदवारानं पटकावली आहेत. आणि त्याचा फायदा त्यांना येत्या विधानसभा निवडणुकीत होईल. एवढं सगळं असूनही पक्ष रजिस्टर होण्याचं मनसेचं स्वप्न अधुरं राहिलं आहे.

close