सूर्यकांता पाटील, पाचपुते आणि खतगावकर भाजपमध्ये

September 4, 2014 8:56 PM0 commentsViews: 2870

surykanta patil pachpute in bjp04 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने आघाडी सरकारला सुरूंग लावला आहे. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. षण्मुखानंद हॉलमध्ये भाजपचा विजय संकल्प मेळावा झाला. या मेळाव्यात राष्ट्रवादीचे माजी आमदार बबनराव पाचपुते, राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील, काँग्रेसचे भास्करराव पाटील खतगावकर, पेड न्यूज प्रकरणाचे याचिकाकर्ते माधवराव किन्हाळकर नांदेडचे माजी महापौर अजयसिंह बिसेन यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

भाजपप्रवेशासाठी आज सकाळीच बबनराव पाचपुतेंनी आमदारकीचा राजीनामा दिला होता. विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सुपूर्द केला. काही दिवसांपूर्वी पाचपुतेंनी राष्ट्रवादीवर टीका करत सोडचिठ्ठी दिली होती. तर राष्ट्रवादीच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील यांनी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करुन राष्ट्रवादीला रामराम ठोकला होता. भाजपचे नेते एकनाथ खडसे यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे बडे नेते लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं नावानिशी स्पष्ट केलं होतं. अखेर आज आघाडीला रामराम ठोकलेल्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

हे नेते झाले भाजपमध्ये दाखल

भास्करराव पाटील-खतगावकर
- मराठवाड्यातले काँग्रेसचे ज्येष्ठ नेते
- तीन वेळा आमदार आणि तीन वेळा खासदार
- 1992 ते 94 या काळात सुधाकरराव नाईक मंत्रिमंडळात राज्यमंत्री

सूर्यकांता पाटील
- मराठवाड्यातल्या राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्या
- 11 वर्षांपासून राष्ट्रवादीची साथ
- दोन वेळा खासदार
- युपीए 1 मध्ये केंद्रीय राज्यमंत्री

बबनराव पाचपुते
- राष्ट्रवादीचे नेते
- श्रीगोंदामधून 5 वेळा आमदार
- युती आणि आघाडी सरकारमध्ये कॅबिनेटमंत्री
- राष्ट्रवादीचे माजी प्रदेशाध्यक्ष

माधवराव पाटील-किन्हाळकर
- पेड न्यूज प्रकरणातले याचिकाकर्ते
- राजकारणातअशोक चव्हाणांचे विरोधक
- माजी राज्यमंत्री
 

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close