पाण्याच्या वादावरून कुटुंबाला टाकलं वाळीत

September 4, 2014 8:41 PM0 commentsViews: 2316

pachora04 सप्टेंबर : जळगाव जिल्ह्यातल्या पारोळा तालुक्यात दोन तरुणांमधल्या वादानंतर मातंग समाजाच्या एका कुटुंबाला गावानं वाळीत टाकल्याची धक्कादायक घटना समोर आलीय. तसंच या कुटुंबाला मदत करणार्‍यांविरोधात गावकर्‍यांनी 500 रुपये दंडाचा फतवा काढला. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली होती मात्र जामीनावर त्यांची सुटका करण्यात आलीये.

एकीकडे ‘सर्वात पुढे महाराष्ट्र माझा’ अशी जाहिरातबाजी सरकार करत आहे पण अजूनही महाराष्ट्र किती मागे आहे याचं जीवंत उदाहरण म्हणजे पाचोर्‍या गावातली ही घटना. दोन तरुणांंमध्ये पाणी पिण्यावरून दोघांमध्ये वाद झाला आणि त्यातून संपूर्ण कुटुंबालाच वाळीत टाकण्यात आलं. मात्र हे प्रकरण एवढ्यावर थांबले नाही तर या कुटुंबाला मदत करणार्‍यांविरोधात गावकर्‍यांनी 500 रुपये दंडाचा फतवा काढलाय. याबद्दल पीडित कुटुंबानं तक्रार केली आहे पण हे कुटुंब भीतीच्या सावटाखाली आहे. याबाबत दोघांना अटक करण्यात आली होती. पण हा सामाजिक बहिष्कार असल्याचं पोलिसांनी अमान्य केलंय आणि त्यांची सुटकाही करण्यात आली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close