प्रकाश मेहरा यांचं निधन

May 17, 2009 8:14 AM0 commentsViews: 2

17 मे, मुंबई प्रसिद्ध सिनेमा निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश मेहरा यांचं दीर्घ आजारानं मुंबईत निधन झालं. मुंबईतल्या कोकिला बेन हॉस्पिटलमध्ये त्यांचं निमोनियानं निधन झालं. फिल्म इंडस्ट्रीमध्ये अमिताभ बच्चन संघर्ष करत असताना मेहरा यांनीच अमिताभला जंजीर सिनेमामध्ये संधी दिली होती. हेरा फेरी, मुकद्दर का सिकंदर, लावारीस, नमक हलाल, शराबी, जादुगर, बाल ब्रम्हचारी या नावाजलेल्या सिनेमांचे ते निर्माते होते. प्रकाश मेहरा मूळचे उत्तर प्रदेशातले. त्यांचा जन्म 1939 सालाचा. त्यांचं बॉलिवुडमधलं योगदान फार महत्त्वाचं समजलं जातं. गेले कित्येक महिन्यांपासून ते किडनीच्या आजारानं त्रस्त होते.गेल्या काही महिन्यांपासून मुंबईतल्या कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. पण अखेर तिथेच त्यांचं निधन झालं.

close