नरेंद्र मोदी आणि जपान, एका दौर्‍याची ‘खास’ गोष्ट !

September 4, 2014 8:25 PM0 commentsViews: 1624

शिल्पा गाड, मुंबई

04 सप्टेंबर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जपान दौरा गाजला अनेक कारणांनी. उगवत्या सूर्याचा देश म्हणून ओळखल्या जाणार्‍या जपानची संस्कृती तितकीच प्राचीन आणि त्यामुळेच वैशिष्टयपूर्णही. या दौर्‍यादरम्यान मोदींनी जपानच्या अनेक चालीरितींमध्ये समरसून भाग घेतला.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तायको ड्रम तालात वाजवायला सुरुवात केली आणि मिटिंमध्ये तोंडावर क्वचितच स्मित पाहायला मिळणार्‍या जपान्यांचे चेहरेही हसरे झाले. तायकोचा जपानी अर्थ आहे मोठा ड्रम. आपल्या ढोलसारखंच हे वाद्य..हे जपानचं 1400 वर्ष जुनं वाद्य. पुर्वी तायको केवळ बौद्ध स्तुपांमध्ये किंवा युद्धप्रसंगी संचलनाच्यावेळी वापरले जायचे. आज जपानमध्ये अनेक ताईको ग्रुप कार्यरत आहेत. त्यापैकी कोदो आणि कोनडेकोझा हे ताईको ग्रुप जगभरात नावाजलेले आहेत. बेताऊ ची, ओ दाईको, मियाके अशा अनेक प्रकारात हे ताईको ड्रम वाजवले जातात.

दौर्‍याच्या सुरवातीलाच मोदींनी आणि जपानचे पंतप्रधान शिंझो आबे यांनी मिळून कोई माशांना खाणं घातलं. हा जपानमधला विशेष विधी आहे. मैत्री वृद्धिंगत होण्याचं हे चिन्ह…जपानमध्ये कोई मासा प्रेम आणि मैत्रीचं प्रतिक मानलं जातं. तर बौद्ध तत्वज्ञानात कोई मासा हे धैर्याचं प्रतिक मानलं जातं. महत्त्वाकांक्षा आणि प्रगतीचंही ते लक्षण समजलं जातं.

तायकोप्रमाणेच दुसरं जपानी वाद्य मोदींनी वाजवलं ते म्हणजे फुए. आठ प्रकारच्या बासर्‍या म्हणजेच फुए जपानमध्ये वाजवले जातात. जपानी बासरीची परंपरा 1200 वर्ष जुनी आहे. त्यातली शिमिझु बासरी सर्वात जुनी.. आजही अनेक प्राचीन बासर्‍या जपानमधल्या काही मंदिरांमध्ये उपलब्ध आहेत. जपानच्या पारंपरीक नोह आणि काबुकी नाट्य प्रकारातही या फुएचा वापर केला जातो.

मोदींनी आणखी एका आणि जपानी लोकांसाठी महत्त्वाच्या मानल्या जाणार्‍या टी सिरेमनीतही भाग घेतला. या टी सिरेमनीला चानोयू असंही म्हणतात. जपानीत ओ च्या म्हणजे चहा. तर चहापान सोहळ्यात वापरल्या जाणार्‍या चहाला मात्चा असा विशिष्ट शब्द आहे. या चहापान सोहळ्यात खोलीची रचना, वापरलं जाणारं चहाचं पात्र, पुष्परचना कॅलिग्राफी, झेन बुद्धिझम या सगळ्यांचे काटेकोर नियम असतात. हा चहापान सोहळा ध्यानाचाच एक प्रकार समजला जाता. जपानमधला चहापान सोहळा हा कला आणि आध्यात्मिकतेचा संगम मानला जातो.

या सगळ्या चालीरितींमध्ये सहभागी होत मोदींनी जपानशी सांस्कृतिक धागा जोडला. बुद्धाच्या मायभूमीतून बुद्धाच्या देशातला मोदींच्या या दौर्‍याला जपानी चालीरीतींनी आणखी पैलू पडले.

जपानी ड्रम
मोदींनी वाजवलेल्या ड्रमचं नाव ताईको
ताईको शब्दाचा अर्थ मोठा ड्रम किंवा मराठीत शब्दश: ढोल
पूर्वी ताईको ड्रम्स केवळ बोद्ध स्तूपात किंवा युद्धकाळात संचलनासाठी वाजवले जायचे
वादिआईको असंही जपानीत ड्रमला म्हणतात

मोदी आणि आबे
कोई माशांना एकत्र मिळून खाणं घालणं
मैत्रीमुळे भरभराट यावी, भरभराट होते अशी समजूत
यामुळे माशांना शक्ती मिळेत आणि त्यांचं संवर्धन होतं
समृद्धी आणि दैव प्रदान करते अशीही समजूत

जपानी टी – सीरेमनी
जपानी लोकांसाठी हा अत्यंत महत्त्वाचा सोहळा
केवळ चहा पिणे नव्हे तर मनापासून संपूर्ण आदरातिथ्याने पाहुण्याला चहा देणं ही टी सिरेमनी

मोदींनी वाजवलं फुए
जपानीत फुए म्हणजे बासरी

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close