गौरी -गणपतींना निरोप

September 4, 2014 10:55 PM0 commentsViews: 222

04 सप्टेंबर : सात दिवसांच्या गौरी -गणपतींचं विसर्जन पार पडलं. रत्नागिरीत पावसानं बर्‍यापैकी उघडीप दिल्याने गणेशभक्तांना विसर्जनात अडथळा आला नाही. रत्नागिरीच्या समुद्राला आज भरती होती. त्यामुळे आरतीसाठी ठेवलेल्या गणेशमुतीर्ंना लाटांचाही थेट अभिषेक होत होता. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत निरोप देताना चाकरमान्यांनी कोकण रेल्वेने होणारा आपला परतीचा प्रवास तरी विना अडथळा होवो असं साकडं यावेळी गणरायाला घातलं.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close