जम्मू-काश्मीरमध्ये पावसाचे थैमान, 70 जणांचा बळी

September 5, 2014 12:03 PM0 commentsViews: 349

jammu rain05 सप्टेंबर : जम्मू आणि काश्मीरमध्ये पावसाने हाहाकार माजवला आहे. गेल्या 2 दिवसांत पावसाच्या तडाख्यामुळे 70 जणांचा मृत्यू झालाय. राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये पुरानं थैमान घातलंय. गुरुवारी राजौरी जिल्ह्यात एक बस दरीत कोसळून 50 जणांचा मृत्यू झाला आहे. तर श्रीनगर, अनंतनाग, पुलवामा आणि पूँछ जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पूर आलाय. तर दरड कोसळून श्रीनगर-जम्मू आणि श्रीनगर-लेह हायवे वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close