आंबा चोरला म्हणून मुलाला ठार मारले !

September 5, 2014 2:24 PM0 commentsViews: 1914

delhi mango deth05 सप्टेंबर : एकीकडे दोन देशातील मैत्रीपूर्ण संबंध आणखी दृढ करण्यासाठी आंबे पाठवले जात आहे पण देशाच्या राजधानीत एक अल्पवयीन मुलाने आंबा चोरला म्हणून त्यांना बेदम मारहाण करून ठार मारण्याची ह्रदयद्रावक घटना घडली आहे. ईशान्य दिल्लीमध्ये सीमापुरी भागात ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केलाय.

समाजात दिवसेंदिवस वाढणार्‍या असहिष्णुतेचं आणखी एक उदाहरण दिल्लीमध्ये गुरुवारी बघायला मिळालं. एका 14 वर्षाच्या मुलानं आंबा चोरला म्हणून आंबे विकणार्‍याने त्याला ठार केल्याची घटना ईशान्य दिल्लीमध्ये सीमापुरी भागामध्ये गुरुवारी रात्री 8 वाजता घडली. हा मुलगा बागेत खेळत असताना आंबाविक्रेता आपल्या साथीदारांसह तिथं गेला आणि त्यांनी त्या मुलाला मारहाण केली, त्यात त्याचा मृत्यू झाला. त्याची चूक एवढीच होती की त्याने आंबा चोरला. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला असून मुलाचा मृतदेह पोस्ट मार्टेमसाठी पाठवण्यात आलंय. या मुलाला लोखंडी सळ्यांनी मारहाण करण्यात आली असा आरोप त्या मुलाच्या नातेवाईकांनी केलाय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close