प्रभाकरनच्या मृत्यूची श्रीलंका करणार अधिकृत घोषणा

May 17, 2009 10:08 AM0 commentsViews:

17 मे लिट्टेप्रमुख प्रभाकरन यानेही आत्महत्या केल्याचा दावा श्रीलंका सरकारने केला आहे. प्रभाकरनच्या मृत्यूची श्रीलंकन सरकार लवकरच अधिकृत घोषणा करणार आहे. लिट्टेच्या मोठ्या नेत्यांनी सामूहिक आत्महत्या केल्याचं सरकारनं सांगितलं आहे. लिट्टेचा एकमेव सागरी मार्गही श्रीलंका सरकारनं बंद करून टाकला आहे. समुद्रकिनार्‍यालगतच्या उरल्यासुरल्या बंडखोरांना लष्कारने वेढा दिला आहे. त्यात प्रभाकर असल्याचं दिसत नाही. त्याचा मृत्यू झाल्याचा दावा तिथल्या स्थानिक मीडियाने केला आहे. प्रभाकरन ज्या सागरी पट्‌ट्यात आहेत त्या भागात अजूनही 50 हजार नागरिक अडकल्याचा अंदाज मदत करणार्‍या संस्थांनी केला आहे.

close