मॉन्टेकसिंग अहुलुवालीयांच नाव अर्थमंत्रीपदासाठी चर्चेत

May 17, 2009 11:06 AM0 commentsViews: 1

17 मे,नव्या सरकारच्या स्थापनेनंतर केंद्रीय प्रमुख पदांचीही नव्याने घोषणा करण्यात येईल. त्यामुळे महत्त्वाच्या पदांवर नेमण्यात येणार्‍या मंडळींची सध्या चर्चा आहे. नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष मॉन्टेक सिंग अहलुवालिया यांना अर्थमंत्रीपदाचा कार्यभार सोपवला जाण्याची शक्यता आहे. काँग्रेसमधल्या उच्चपदस्थ सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान मनमोहन सिंग हे अहलुवालिया यांच्या नावासाठी आग्रही आहेत. पी. चिदंबरम यांना गृहमंत्रीपद दिल्यानंतर अर्थमंत्रीपदाचा कार्यभार पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्याकडेच आहे. त्यामुळे अहलुवालिया अर्थमंत्री झाले तर त्यांनाही डॉ. मनमोहन सिंग यांच्याप्रमाणेच राज्यसभेवर जावं लागणार आहे.

close