नांदेडमध्ये उद्धव ठाकरेंची सभा

September 6, 2014 12:36 PM0 commentsViews: 1100

udhav thakarey in nasik06 सप्टेंबर : नांदेड जिल्ह्यात लोहा इथं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची प्रचारसभा होणार आहे. सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आलीये. लोहा येथील बाजार मैदानात दुपारी ही सभा आयोजित करण्यात आलीये.

त्यापूर्वी नांदेड विमानतळ ते लोहा पर्यंत रॅली काढण्यात आली. या सभेच्या माध्यमातून चिखलीकर आपलं शक्तीप्रदर्शन करणार आहेत. सभेत सव्वा ते दीड लाखाहुन अधिक जन समुदाय उपस्थित राहिल अशी मोर्चेबांधणी चिखलीकर यांनी केली आहे.

दोनच दिवसांपूर्वी आघाडीच्या नांदेडच्या तीन नेत्यांनी भाजपात प्रवेश केलाय. हा प्रवेश म्हणजे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाणांसाठी धोक्याची घंटा आहे.

विधानसभा निवडणुकीत नांदेड जिल्ह्यातील नऊ च्या नऊ जागा काँग्रेस आघाडीने जिंकल्या होत्या. इतकच नाही तर मोदी लाटेतही लोकसभा निवडणुकीत अशोक चव्हाण विजयी झाले होते. त्यामुळे महायुतीने नांदेडकडे विशेष लक्ष दिलंय. याच सभेत आता उद्धव काय बोलतात याकडे सगळ्याचं लक्ष लागलेल आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close