राष्ट्रवादीच्याही प्रचाराचा आज फुटणार नारळ

September 6, 2014 1:56 PM0 commentsViews: 747

24ncp_samana06 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्यासाठी राष्ट्रवादीही आता मैदानात उतरली आहे. काँग्रेस पाठोपाठ आज राष्ट्रवादीही प्रचाराचा नारळ फोडणार आहे. मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये राष्ट्रवादी प्रचाराला शुभारंभ करणार आहे.

या कार्यक्रमापुर्वी समता दिंड्या निघणार आहेत. सहा ठिकाणाहून सुरू होणार्‍या या दिंड्यांची सांगता यशवंतराव चव्हाण सेंटर येथे होईल. या दिंड्यामध्ये सहा ठिकाणाहून राष्ट्रवादीचे नेते टप्प्या-टप्प्याने सहभागी होणार आहे. सर्वात शेवटी यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यास पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुष्पहार घालून अभिवादन करुन दिंडीत सहभाग होतील.

यावेळी शरद पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहे. विशेष म्हणजे आघाडीत जागावाटपाचा तिढा अजून कायम आहे मात्र तिढा सुटेल तेव्हा सुटेल प्रचाराला सुरूवात केली पाहिजे असं म्हणत राष्ट्रवादी आज प्रचाराचे रणशिंग फुंकणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close