कोयना भरलं

September 6, 2014 4:15 PM0 commentsViews: 992

06 सप्टेंबर : सातारा जिल्ह्यातील कोयना धरण उशीरा आलेल्या पावसाने का होईना पण भरलंय. 105 टीएमसी क्षमता असलेल्या या धरणात आता 103 टीएमसी इतका पाणी साठा जमा झाला आहे. यामुळे धरणाचे दरवाजे दीड फुटांनी उघडण्यात आले आहेत. आज सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. 16,245 क्यसेक पाण्याचा विसर्ग केला जातोय. हे पाणी सोडल्याने आता नदीकाठच्या गावांना सर्तकतेचा इशारा देण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close