…मग नवीन खाती कशाला ?

September 6, 2014 5:00 PM0 commentsViews: 3261

06 सप्टेंबर : मोदी सरकारच्या जन धन योजनेचा भाजपाच्या कार्यकर्त्यांनी गावोगावी प्रचार सुरू केलाय. यासाठी प्रत्येक नागरीकांनी बँकेत खातं उघडावं असं आवाहन करीत भाजप कार्यकर्त्यांच्या गाड्या ग्रामीण भागात फ़िरू लागल्या आहेत. पण अगोदरच बँकेत खाती असणार्‍या नागरीकांना नवीन खातं उघडण्याचा आग्रह धरला जात आहे. त्यामुळे अगोदरचं खातं असताना नव्या खात्याची गरज काय ? असा सवाल नागरीक करत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जन धन योजनेचा शुभारंभ केला. 26 जानेवारीपर्यंत योजना पूर्ण करूया असं आवाहनही मोदींनी दिलं मात्र कमीतकमी वेळेत जास्तीत जास्त खाती उघडण्याचं उद्दिष्ट बँकांना दिलं. गेल्यामुळे मनुष्यबळाअभावी बँकांनी पहिलीतल्या विद्यार्थ्यापासून ते 70 वर्षाच्या आजीचंही खातं उघडत लाभार्थीची यादी तयार केलीय. तर दुसरीकडे आमची आधीची खाती असताना हा नवीन खाती उघडण्याचा खटाटोप कशाला असंही काही नागरीक विचारत आहे. योजनेची पुरेशी माहितीही या खातेदारांना नसल्याचं उघड झालंय. रत्नागिरीतल्या मेर्वी गावातल्या अशाच खातेदारांना याचा अनुभव आलाय. तर जनधन योजना चांगली असली तरी ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी बँकांकडे पुरेसं मनुष्यबळ नसल्याचं सांगत पुढच्या पाच वर्षांचा विचार करता दोन ते अडीच लाख लिपिकांची बँकांना आवश्यकता असल्याचं बँक कर्मचारी युनियनच्या प्रतिनिधींचं म्हणणं आहे. तसंच या योजनेंअतर्गत बँकेत खातं उघडण्यासाठी कोणतेही वयोमर्यादेचे आदेश नसल्याचंही या प्रतिनिधींनी स्पष्ट केलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close