शरद पवार केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार

May 17, 2009 1:15 PM0 commentsViews: 1

17 मे, 'आपण मंत्रिमंडळात जाणार नाही अशा बातम्या येत होत्या, मात्र त्या केवळ वावड्याच आहेत, आपण केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार' असं स्पष्टीकरण खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना दिलंय. राष्ट्रवादीला मताधिक्य मिळेल असा दावा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला होता, पण निकाल हाती आल्यावर राष्ट्रवादीला अपेक्षित यश साधता आलं नाही. तरीही शरद पवार यांना सरकार स्थापनेबद्दल अजूनही अपेक्षा आहेत. राष्ट्रवादीला दोन मंत्रिपदं मिळण्याची शक्यता आहे. पवारांना त्यांचं सध्याचं कृषिखातंच मिळू शकतं. पण प्रफुल्ल पटेल यांच्याकडं असलेलं नागरी विमान वाहतूक मंत्रालय पुन्हा मिळेल की नाही, याबद्दल शंका आहे. दरम्यान मिळेल त्या खात्याचा राष्ट्रवादी काँग्रेस स्वीकार करेल, असं पटेल यांनी म्हटलंय. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला 200 जागा मिळाल्या आणि राष्ट्रवादीला केवळ 9 चं जागांवर समाधान मानावं लागलं असलं तरी शरद पावार आणि प्रफुल्ल पटेल यांसारखे अनुभवी नेते असल्यावर निवडणुकीतला राष्ट्रवादीचा हा मुद्दा आड येणार नाही असं सांगण्यात येत आहे. निवडणुकीच्या पाश्‍र्वभूमीवर अशा चर्चा नेहमीच होतात पण त्या कितपत खर्‍या ठरतात हे सरकार स्थापनेच्या प्रक्रियेदरम्यान लवकरच ठरेल.

close