आता राजच म्हणाले, ब्ल्यू प्रिंट 25 सप्टेंबरला !

September 6, 2014 10:30 PM0 commentsViews: 1818

raj on blue print06 सप्टेंबर : मोठ्या प्रतिक्षेनंतर मनसेच्या ब्ल्यू प्रिंटसाठी 10 तारखेचा मुहूर्त सापडला होता मात्र हा मुहूर्तच चुकीचा होता. मनसेची ब्ल्यू प्रिंट 10 सप्टेंबरला नाहीतर 25 सप्टेंबरला प्रसिद्ध होणार आहे खुद्ध मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ही घोषणा केलीय.

मनसेची ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध करायचीच आहे. पण आमच्या पक्षातील कुणीतरी 10 तारखेला प्रसिद्ध होणार असं जाहीर करून टाकलं. ब्ल्यू प्रिंटवर काम सुरू असून 25 सप्टेंबर ही अधिकृत तारखी आहे, घटस्थापनेच्या दिवशी ब्लू प्रिट प्रसिद्ध होणार असं राज यांनी स्पष्ट केलं.

ब्ल्यू प्रिंटच्या सादरीकरणाच्या रंगीत तालीमसाठी 10 तारखेला षण्मुखानंद सभागृह बुक करण्यात आलं होतं, अशी माहितीही राजनी दिली. ब्लू प्रिंटचं फक्त सादरीकरण होणार नाही, तर त्यात लोकांचा सहभाग असेल, असा अप्रत्यक्ष टोला त्यांनी शिवसेनेला लगावलाय. दरम्यान, उमेदवार निवडीची प्रक्रिया पूर्ण होत आलीय. येत्या 12 तारखेला मराठवाड्याचा दौरा करणार असल्याचं राज ठाकरे यांनी सांगितलं.

‘मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा’ अशी गर्जना करत राज ठाकरे यांनी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना नावानं पक्ष स्थापन केला. मराठीचा मुद्दा आणि महाराष्ट्राचा विकासावर भाष्य करत मनसे आता आपल्या दुसर्‍या विधानसभा निवडणुकीला सामोरं जातं आहे.

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या विकासासाठी ब्ल्यू प्रिंट सादर करणार असं गोड आश्वासन दाखवलं होतं. पण ही ब्ल्यू प्रिंट कशी असणार ? कधी येणार आणि नेमकं तिचं स्वरूप कसं असणार यावरुन बरीच चर्चा रंगली. लोकसभा निवडणुकीत सुपडा साफ झाल्यानंतर राज यांनी आता अखेरीस आपली ब्ल्यू प्रिंट सादर करण्याचं मनाशी पक्क केलंय. मध्यतंरी ऑगस्ट महिन्यातच ब्ल्यू प्रिंट सादर होईल अशी चर्चा रंगली होती.

पण राज यांनी ही केवळ सोशल मीडियावर चर्चा होती असं काही अजून ठरलं नाही, जे काही ठरवायचं आहे ती लवकरच जाहीर करेन असं राज यांनी स्पष्ट केलं होतं. विशेष म्हणजे मध्यंतरी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘चला महाराष्ट्र घडवूया’ अशी साद देत सेनेचं व्हिजन डॉक्युमेंट सादर केलं. त्यामुळे मनसेची ब्लू प्रिंट कधी येणार अशी कुजबूज सुरू झाली होती. अखेरीस येत्या 25 सप्टेंबरला ब्ल्यू प्रिंटला मुहूर्त मिळाला आहे. आता ही ब्ल्यू प्रिंट कशी असणार याकडे सगळ्यांचं लक्ष्य लागलंय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close