पंकजा मुंडेंना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान का दिलं नाही?- भुजबळ

September 7, 2014 11:14 AM0 commentsViews: 3559

07 सप्टेंबर :  लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनानंतर त्याची कन्या पंकजा मुंडे यांना केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान देण्यात येईल, असे सांगितले जात होते; पण प्रत्यक्षात तसे घडले नसल्याचा टोला सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांनी शनिवारी भाजपला लावला. पक्षात बराच वेळ संघर्ष केल्यानंतर मुंडेंच्या पदरात मोठं पद पडलं, पण त्यांच्या निधनानंतर पंकजा मुंडेंना मंत्रिपद देण्यासाठी भाजप नेते टाळाटाळ का करतायेत, असाही सवाल त्यांनी विचारला. राष्ट्रवादीच्या पहिल्या प्रचार सभेच्या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी आक्रमकपणे भाजप प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्यावर थेट निशाणा साधला.

मला जातीयवादाचा मुद्दा उपस्थित करायचा नाही, असं म्हणत, भुजबळांनी नितीन गडकरी, प्रकाश जावडेकर आणि पियुश गोयल यांना मोदींनी मंत्रिमंडळात स्थान दिलं. त्यानंतर विजया रहाटकर, श्याम जाजू, विनय सहस्रबुद्धे, सतीश वेलणकर यांना महाराष्ट्रातून स्थान मिळालं. या वेळी भाजप नेतृत्वाला पांडुरंग फुंडकर, प्रकाश शेंडगे, पाशा पटेल, यांच्याबरोबरच इतर काही नेत्यांची नावं घेऊन भाजपात गेल्यानंतर त्यांच्या पदरात काय पडलं, असा सवाल उपस्थित करत भाजप नेत्यांवर टीका केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close