मनमोहन सिंग 21 तारखेनंतर पंतप्रधानपदाची शपथ घेणार

May 17, 2009 3:26 PM0 commentsViews: 7

17 मे, नव्या सरकारच्या स्थापनेवर चर्चा करण्यासाठी काँग्रेस वकिर्ंग कमिटीची बैठक दिल्लीत नुकतीच पार पडली. आयबीएन लोकमतला मिळालेल्या माहितीनुसार नव्या सरकारची स्थापना 21 तारखेनंतर होण्याची शक्यता आहे. 21 तारखेनंतर मनमोहन सिंग काळजीवाहू पंतप्रधानपदाची शपथ घेणार असल्याचं समजतंय. नव्या सरकारच्या स्थापनेवर निर्णायक भूमिका घेण्यापूर्वी काँग्रेसच्या कोअर कमिटीची बैठक झाली. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी लालूप्रसाद यादव, रामविलास पासवान, आणि शरद पवार या आपल्या जुन्या सहकार्‍यांना फोन केल्याचं सांगण्यात येत आहे. फोनवरील संभाषणात सोनियांनी त्यांना उद्या होणार्‍या मंत्रिमंडळाच्या बैठकीसाठी निमंत्रण दिल्याचंी चर्चा आहे. यावरून लालूप्रसाद यांना मंत्रिमंडळात पुन्हा स्थान मिळेल, अशी शक्यता सूत्रांनी व्यक्त केलीय. एकीकडे समाजवादी पक्षाच्या अमरसिंग आणि मुलायम सिंग यांनी पंतप्रधानांची भेट घेतल्याचं समजतंय. त्यावेळी त्यांनी नव्या सरकारला पाठिंबा देण्याचीही तयारी दाखवली आहे. लोकसभा निवडणुकीनंतर नवं सरकार स्थापन होताना यूपीए आघाडीचे जुने मित्रंच परत सत्तेवर येतील की, निवडणुकीत अपेक्षित यश साधता न आलेल्या इच्छुक पक्षांनाही शेवटच्या संधीचा लाभ उठवता येईल, हे लवकरच स्पष्ट होईल.

close