काळा पैसा आणण्याचा दावा करणार्‍यांनी 100 रुपयेही परत आणले नाहीत- मुख्यमंत्री

September 7, 2014 7:29 PM1 commentViews: 634

Cm on Pm

07 सप्टेंबर :  मोदी सरकारला 100 दिवस पूर्ण झाले असले तरी अद्याप काळ्या पैशातील 100 रुपयेही मोदी सरकारने परत आणलेले नाहीत असा सणासणीत टोला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने आज रविवारी दोन प्रचार पुस्तिकांचे प्रकाशनाच्यावेळी ते बोलत होते.’जिंकणारच’ असे या प्रचार पत्रिकेचं नाव असून यामध्ये माहिती आणि व्यंगचित्रांचा समावेश आहे. या पुस्तिकांमधून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले जाणार आहे. तर दुस-या पुस्तिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेले घुमजाव यावरही सखोल माहिती दिली असल्याचे नारायण राणे यांनी सांगितले.

या प्रकाशन सोहळ्याला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, प्रचार समितीचे प्रमुख नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आदी नेते उपस्थित होते. तसेच जाहीरनामा समितीच्या प्रमुखपदी सुशीलकुमार शिंदे असून लवकरच जाहीरनाम्याचे काम पूर्ण होईल असंही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी स्पष्ट केले. भाजप सरकारने जनतेला दिलेली आश्वासन पाळली नाहीत अशी टीकाही पृथ्वीराज चव्हाण यांनी केली.

काँग्रेसने या पुस्तकाच्या माध्यमातून मोदींच्या टीकेला उत्तर देण्याचाही प्रयत्न केला. मोदी सरकारने 100 दिवसांमध्ये फारसे काम केले नाही, मोदी सरकारचा हाच कारभार सर्वांसमोर आणायचा प्रयत्न करू असं मुख्यमंत्री म्हणाले. ट्विटरवरुन जनतेची मतं मागवून एखादी संस्था निर्माण करण्यास किती वर्ष लागतील हे माहित नाही, तोपर्यंत नियोजन कसं करणार असा टोला मुख्यमंत्र्यांनी मोदींना लगावाला आहे. तसचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुख्यमंत्री होण्याची क्षमताच नाही, अशी बोचरी टीका राणेंनी केली.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

  • GreatIndia

    Swatache theva jhakun ani dusryache bhaga jakhun. Shivaji Maharaj statue mumbai la karnar hote ubhe.

close