काँग्रेसजवळ 281 संख्याबळ असल्याचा पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा

May 18, 2009 10:03 AM0 commentsViews: 20

18 मे, काँग्रेसजवळ सध्या अपक्षांच्या पाठिंब्यासह 281 संख्याबळ असल्याचा दावा काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी आयबीएन लोकमतशी बोलताना केला आहे. नव्या सरकारच्या स्थापनेसाठी काँग्रेसला संख्याबळ वाढवण्याची काळजी नसल्याचंही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी सांगितलं. यूपीए सरकारला मोठी आघाडी मिळाली असून आता केवळ 12 खासदारांची गरज आहे. त्यासाठी 10 अपक्ष खासदार, 1 ते 2 प्रादेशिक छोट्या पक्षातील खासदार आणि 3, 4 किंवा 5 सदस्य पक्षातील खासदारांची मदत घ्यावी लागेल अशीही माहिती त्यांनी यावेळी दिली. पण यांपैकी खासदारांची निवड करताना कोणाचं समर्थन करायचं आणि कोणाला प्राधान्य द्यायचं याचा नक्कीच विचार करण्यात येईल, असंही त्यांनी म्हटलंय. मंत्रिमंडळात मोठ्या संख्येने तरुणांना संधी देण्याचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी बोलताना सांगितलं. राहुल गांधी यांना मंत्रिमंडळात सहभागी करून घेणार का अशी विचारणा केली असता खुद्द पंतप्रधानांनी राहुल यांनी मंत्रिमंडळात कामकाज पाहवं असा आग्रह धरला आहे. राहुलसारख्या तरूण आणि होतकरू नेत्याने संघटनेचं काम पाहतानाच मंत्रिमंडळाच्या कामातंही लक्ष द्यावं अशी इच्छा पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली. राहुलने मंत्रिमंडळाचं कामकाज पाहावं अशी काँग्रेसच्या मित्रपक्षांचीही इच्छा असल्याचं त्यांनी सांगितलं. ग्राऊण्ड रिऍलिटीवर काँग्रेसची ताकद वाढली असून जागा वाढवून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचं पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितलं. पण सरकार स्थापनेसाठी काँग्रेसकडे संख्याबळ असल्यामुळे युती करणं कठीण जाईल अशी शक्यताही पृथ्वीराज चव्हाण यांनी यावेळी व्यक्त केली.

close