विसर्जनाला गालबोट, ट्रकवरून पडून कार्यकर्त्याचा मृत्यू

September 8, 2014 2:48 PM0 commentsViews: 2448

visarjan_1 dead08 सप्टेंबर : एकीकडे लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय मात्र बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागलंय. आज सकाळी घाटकोपरच्या पारशिवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचा कार्यकर्त्याचा विसर्जनाचा ट्रक सजवताना खाली पडून मृत्यू झाला. दत्ताराम
लक्ष्मण सकपाल असं या कार्यकर्त्याचं नाव आहे.

पहाटे 5 वाजता बाप्पाच्या विसर्जनासाठी ट्रक सजवत असताना सकपाल कोसळले. त्याला उपचारासाठी राजावाडी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं. मात्र राजावाडी हॉस्पिटलमध्ये ड्युटीवर असलेल्या डॉक्टरनी वेळेवर उपचार न केल्यामुळे त्याचा मृत्यू झाला असा आरोप सकपाल यांच्या नातेवाईकांनी केला आहे. जोपर्यंत त्या  डॉक्टर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह ताब्यात घेणार नाही असं नातेवाईक म्हणणं आहे. या प्रकरणी अजूनही कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close