नव्या सरकार स्थापनेचं काऊण्टडाऊन सुरू : काँग्रेस करणार सरकार स्थापनेचा दावा

May 18, 2009 11:20 AM0 commentsViews: 1

18 मे, आता सगळ्यांच लक्ष लागलंय ते नव्या सरकारच्या स्थापनेकडे… सकाळी साडे दहाच्या सुमारास मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. यावेळी सगळ्या मंत्र्यांनी आपला राजीनामा पंतप्रधानांनकडे सोपवला आहे. त्यानंतर दुपारी साडेबाराच्या सुमारस पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी राष्ट्रपतींची भेट घेऊन आपल्या पंतप्रधानपदाचा राजीनामा मंत्रीमडळात सादर केला. आता 14 वी लोकसभा बरखास्त होऊन नविन मंत्रीमंडळाची स्थापना होईपर्यंत मनमोहनसिंग काळजीवाहु पंतप्रधान म्हणून काम पाहतील. त्यानंतर उद्या काँग्रेस मनमोहनसिंग यांची नेतेपदी निवड करणार असल्याचं समजतंय. तसंच उद्या अपक्ष खासदार आपल्या पाठिंब्याचं पत्र मनमोहनसिंग यांना देणार आहेत. त्यानंतर काँग्रेस सरकार स्थापनेचा दावा करेल,अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

close