राष्ट्रीय लोक दल एनडीएची साथ सोडणार

May 18, 2009 12:42 PM0 commentsViews: 4

18 मे, राष्ट्रीय लोकदलाचे अध्यक्ष अजित सिंग एनडीए सोडण्याची शक्यता आहे. रविवारी दिग्वीजय सिंग यांनी अजित सिंग यांची भेट घेतली होती. यासंदर्भात अजित सिंग सोनिया गांधी यांची आज भेट घेण्याची शक्यता आहे. अजित सिंग यांनी लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसोबत युती केली होती. त्यांच्या पक्षाला 5 जागा मिळाल्या आहेत. अजित सिंग यांनी भाजपची साथ सोडली तर तो एनडीएला मोठा धक्का असेल अशी राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

close