राशी-2 बियाण्यासाठी सातबारा सक्तीचा करण्याला शेतकर्‍यांचा विरोध

May 18, 2009 12:53 PM0 commentsViews: 8

18 मे जळगाव जिल्ह्यातल्या पारोळ्यामध्ये राशी टू या कापसाच्या बियाण्यांसाठी सातबारा सक्तीचा केल्याने शेतकरी संतप्त झालेत. यावेळी शेतकर्‍यांनी बियाण्यांची आठ दुकानं फोडली आहेत. तर इतर दुकानांमध्ये लुटमार केली आहे. संतप्त पोलिसांना थांबवण्यासाठी पोलिसांनी मध्येच हस्तक्षेप केला. पण् संतप्त शेतकर्‍यांनी पोलिसांवर दगडफेक केली. या दगडफेकीत 10 पोलीस जखमी झालेत. यात डीवायएसी आणि एक पीसआय यांचा समावेश आहे. शेतकर्‍यांना थांबवण्यासाठी पोलिसांना हवेत गोळीबार करावा लागाला. त्यासाठी त्यांनी गोळीबाराचे 15 राऊंड फायर केलेत. महाराष्ट्रात फक्त जळगावमध्येच राशी-2 आणि जीटी-2 या बियाण्यांसाठी शेतकर्‍यांना सातबारा सक्तीचा केला आहे. तसंच ज्या शेतकर्‍यांची दोन एकर जमीन आहे त्या शेतकर्‍यांना फक्त दोनच पाकिटं राशीची मिळणार आहेत. तसंच ज्या शेतकर्‍यांची शंभर एकर जमीन आहे, त्यांनाही दोनच पाकिटं शासन देणार आहे. ज्या शेतकर्‍यांनी थोडे पैसे भरून राशी-2 चं बियाणं आगाऊ बुक करून ठेवलं होतं त्यांनाही आता दोनच बियाण्यांची पाकिटं शासन देणार आहे. शासनाचा हा निर्णय म्हणजे एकप्रकारे शेतकर्‍यांना कात्रीत पकडल्यासारखंच आहे. आज जळगावच्या पारोळामध्ये आज राशी-2 या बियाण्यांचं वाटप करण्यात येणार होतं. हीच संधी साधून शेकर्‍यांचा संतापाचा उद्रेक झाला.

close