सातार्‍यात डॉल्बीच्या आवाजानं भिंत कोसळली, 3 ठार

September 9, 2014 10:10 AM0 commentsViews: 3607

satara 1

09 सप्टेंबर : सातार्‍यातल्या राजपथ भागात काल (सोमवारी) रात्री गणपती विसर्जन मिरवणुकीतल्या डॉल्बी साऊंड सिस्टीमच्या आवाजामुळे भिंतकोसळून तिघांचा मृत्यू झाला आहे.

सातार्‍यात काल गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीतल्या डॉल्बीच्या आवाजाच्या दणक्याने हादरे बसून एका घराची भिंत कोसळली. या भिंतींच्या ढिगार्‍याखाली 3 जण ठार झालेयत तर 2 जण गंभीर जखमी झालेत.

जखमींना सातार्‍याच्या सिव्हिल हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. भिंत कोसळल्याप्रकरणी इमारतीच्या मालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इमारत धोकादायक असल्याची नोटीस देऊनही, इमारत पाडली नसल्याने हा अपघात झाला असून 3 जणांच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close