अमेरिकेत उफाळून आला गर्भपाताबाबतचा वाद

May 18, 2009 3:13 PM0 commentsViews: 7

18 मे गर्भपाताला कायदेशीर परवानगी द्यायची की नाही हा वाद अमेरिकेत पुन्हा एकदा उफाळून आला आहे. गर्भपाताच्या कायदेशीर मान्यतेबाबत कितीही टोकाचे मतभेद असले तरी या विषयावर खुली चर्चा झाली पाहिजे, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा म्हणालेत. अमेरिकन कॅथलिक विद्यापीठात एक कार्यक्रम झाला होता. त्या कार्यक्रमात बराक ओबामा गर्भापाताबाबत बोलले. त्यावेळी ' ढोंगीपणाने विरोधी मतांना दडपवता येणार नाही, असंही ओबामा यांनी त्यांच्या भाषणात ठामपणे सांगितलं. यापूर्वीही ओबामा यांनी आपल्या निवडणूक प्रचारात गर्भपाताला कायदेशीररित्या मान्यता देण्याची जाहीर भूमिका घेतली होती. ओमाबा यांनी कॅथलिक विद्यापीठातल्या भाषणात गर्भपाताबाबत घेतलेल्या सकारात्मक भूमिकेला विद्यर्थ्यांनी विरोध केला. त्यावेळी याविद्यार्थ्यांनी आरडाओरडा करून गोंधळ घालण्याचाही प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी आंदोलकांना बाहेर काढलं.

close