जम्मू-काश्मीरमधलं बचावकार्य युद्धपातळीवर

September 9, 2014 11:34 AM0 commentsViews: 1155

jammu_floods_rescue_pti_65009 सप्टेंबर : गेल्या 6 दशकातल्या सर्वात मोठ्या पुरानं जम्मू-काश्मीरला झोडपून टाकलं आहे. या पुरातल्या मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्याआता दोनशेवर पोचली असून लाखो लोक बेघर झाले आहेत. श्रीनगरचा काही भाग अजूनही पाण्यात बुडालेला आलं आहे. जम्मू आणि परिसरातील पूर ओसरला आहे. वैष्णो देवी यात्रा चार दिवस बंद राहिल्यानंतर पुन्हा सुरू करण्यात आली आहे. परंतु, श्रीनगर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले आहे. श्रीनगरमध्ये ढगाळ वातावरण असल्यानं हवाई वाहतुकीवर परिणाम होणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार श्रीनगरमध्ये 7 लाख लोक अडकले आहेत. जम्मूमध्ये आज पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. आतापर्यंत 22 हजार लोकांचे प्राण वाचवण्यात आले आहेत. दरम्यान जम्मू-काश्मीर हायवेचा काही भाग वाहून गेला तर काश्मीरशीही संपर्क तुटला आहे. नॅशनल हायवेवर दुरुस्तीचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पुढच्या 4-5 दिवसांमध्ये हा संपर्क पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न सुरू आहे.

या पूरपरिस्थितीशी लढण्यासाठी लष्कराचं ऑपरेशन ‘मेघ राहत’ सुरू करण्यात आलं आहे. या महापुराने अडकलेल्या प्रत्येकाची सुटका करेपर्यंत ‘ऑपरेशन मेघ राहत’ सुरु राहणार असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. अन्न, पाणी, औषधं, तंबू आणि इतर जीवनावश्यक वस्तू घेऊन हवाई दलाची विमानं पूरग्रस्त भागात मदत पोचवत असल्याची माहिती केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close