कोळसा खाणवाटप रद्द करण्यास केंद्राचा पाठिंबा, सुप्रीम कोर्टात मांडली भूमिका

September 9, 2014 2:22 PM0 commentsViews: 393

Coal and SC
09 सप्टेंबर : सुप्रीम कोर्टाने बेकायदेशीर ठरवलंले 218 कोळसा खाणींचं वाटप रद्द करावं, अशी भूमिका केंद्र सरकारने आज सुप्रीम कोर्टाकडे मांडली आहे. सरकारने कोर्टात दोन पर्याय मांडले आहेत. त्यात सध्या सुरू असलेल्या 46 कोळसा खाणी ताब्यात घेण्यासाठी कोल इंडियाला परवानगी द्यावी किंवा नवीन वाटप होईपर्यंत आहे त्या मालकांनाच खाणी सुरू ठेवण्याची मुभा द्यावी, असे पर्याय सरकारने सुप्रीम कोर्टासमोर मांडले आहे

दरम्यान, सीबीआयचे संचालक रणजीत सिन्हा यांच्या अडचणी वाढल्यात. कोळसा घोटाळ्यातल्या आरोपीला पाठिशी घातल्याच्या याचिकेवरून रणजीत सिन्हा यांना सुुप्रीम कोर्टाने नोटीस बजावलीय. कोळसा घोटाळ्याच्या आरोपींची स्वत:च्या घरी भेट घेतल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. याप्रकरणी प्रशांत भूषण यांनी याचिका दाखल केली होती. रणजीत सिन्हा यांनी 10 दिवसांमध्ये उत्तर द्यावं असे आदेश कोर्टानं दिले आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close