विधानसभेसाठी काँग्रेसचे आडाखे हायकमांड ठरवणार – अशोक चव्हाण

May 18, 2009 3:19 PM0 commentsViews:

18 मे काँग्रेसने विधानसभेसाठी स्वबळावर लढावं किंवा राष्ट्रवादीसोबत लढावं याचा निर्णय हायकमांड घेईल, असं मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटलं आहे. महाराष्ट्रातल्या नवनिर्वाचित खासदारांनी मुख्यमंत्री अशोक चव्हाण आणि प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यासोबत सोनिया गांधींची आज भेट घेतली. यावेळी बहुजन विकास आघाडीचे खासदार बळीराम जाधव यांनीही सोनिया गांधींची भेट घेऊन युपीएला पाठिंबा जाहीर केला. यावेळी केंद्रीय मंत्रिमंडळात महाराष्ट्राला पूर्वी इतकेच प्रतिनिधित्व मिळेल अशी आशा माणिकराव ठाकरे यांनी व्यक्त केली.

close