अमरावतीत काँग्रेसने दाखवला राष्ट्रवादीला ‘हात’, महापौरपदी नंदा कौर

September 9, 2014 3:57 PM0 commentsViews: 1906

amravati09 सप्टेंबर : विधानसभा निवडणुकीसाठी आघाडीत बिघाडीचे चिन्ह आहे मात्र अमरावती महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीत आघाडीत फूट पडलीये. काँग्रेसने हातचा विजय खोडके गटाच्या पदरात पाडलाय. त्यामुळे राष्ट्रवादीचे बंडखोर नेते संजय खोडके गटाच्या रिना नंदा कौर महापौर झाल्या आहेत. तर उपमहापौरपदी काँग्रेसचे शेख जफर यांची वर्णी लागलीय.

महापौरपदाच्या निवडणुकीत रिना नंदा यांना 47 तर राष्ट्रवादीच्या सपना ठाकूर यांनी फक्त 8 मतं मिळाली. खोडके गटाला 47 मतं, सेनेला 21 तर राष्ट्रवादीला 7 मतं पडली आहेत. अमरावती महापालिकेत काँग्रसचे सर्वाधिक 29 नगरसेवक आहेत.

सर्वात जास्त 29 सदस्य संख्या असलेल्या राष्ट्रवादीमधून निलंबित करण्यात आलेले संजय खोडके यांच्या गटाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. काँग्रेसचे गटनेते बबलू शेखावत यांनी खोडके गटाच्या सौ. रिना नंदा यांना महापौरपदासाठी तर शेख जफर यांना उपमहापौर पदासाठी मतदान करावे असा व्हिप जारी केला होता. पण काँग्रेसनं या निवडणुकीत राष्ट्रवादीनं निलंबित केलेल्या संजयय खोडके यांनाच जवळ करत धक्का दिला.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close