महाराष्ट्रात येत्या 3 दिवसांत अतिवृष्टीचा इशारा

September 9, 2014 5:57 PM0 commentsViews: 2434

heavy rainfall09 सप्टेंबर : दडी मारुन बसलेल्या पावसाने पुन्हा एकदा दमदार ‘कमबॅक’ केलंय. पुढच्या तीन दिवसांत महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय.

पुढच्या दोन दिवसांत विदर्भ आणि मराठवाड्याला जोरदार पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्यालाही अतिवृष्टीचा इशारा तडाखा बसू शकतो असा इशारा भारतीय हवामान खात्याने दिला आहे.

खबरदारी म्हणून केंद्र सरकारने रेड ऍलर्ट जारी करण्यात आलाय. दरम्यान, जळगाव, गडचिरोली, विदर्भाला पावसाने झोडपून काढले आहे. जळगावमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झालीये. तर गडचिरोलीतही पावसाने धूमशान घातले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close