आघाडीचा कारभार फक्त 6 पानांचा -फडणवीस

September 9, 2014 8:41 PM0 commentsViews: 1642

devendra fadnvis09 सप्टेंबर : आगामी विधानसभेसाठी काँग्रेसच्या जिंकणारच या प्रचार पुस्तिकेचा भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी चांगलाच समाचार घेतला. ते श्रीगोंद्यातील शेतकरी मेळाव्यात बोलत होते.

पत्रिकेतल्या 19 पानांपैकी 13 पानं फक्त नरेंद्र मोदींवर टीका करण्यासाठीच खर्च केली आहेत. आघाडीचा कारभार काहीच दाखवण्यासारखा नसल्यानं त्यासाठी त्यांनी फक्त 6 पानं खर्च केल्याचा टोला देवेंद्र फडणवीस यांनी लगावला.

महायुतीचं सरकार आल्यावर अजित पवार तुरुंगात चक्की पिसणार असाही दावा फडणवीसांनी केलाय. राष्ट्रवादीवर टीका करताना फडणवीसांनी भुजबळांनाही लक्ष्य केलं. ‘ओबीसी’ च्या मागण्यासाठी लढणार्‍या भुजबळांच्या शिक्षण संस्थेत ओबीसींना स्थान नाही, भुजबळानी नौटंकी बंद करावी, असा टोल फडणवीस यांनी लगावला. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या बबनराव पाचपुते यांनी हा मेळावा आयोजित केला होता.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close