कान्स फिल्म फेस्टमध्ये आगामी सिनेमा काईटस्‌चं प्रमोशन

May 18, 2009 3:51 PM0 commentsViews: 2

18 मे,ऐश्‍वर्या राय बच्चन आणि शर्मिला टागोर यांच्यानंतर कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये दिसला तो ह्रतिक रोशन. यावेळी त्याने बारबरा मोरी या हॉलीवुडच्या अभिनेत्री बरोबर आगामी सिनेमा 'काईटस्'चं प्रमोशन केलं. 'काईटस्' या सिनेमातील ह्रतिक रोशन आणि बारबरा मोरी ही जोडी आपल्याला 62 व्या कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये बघायला मिळाला. या वर्षाच्या अखेरपर्यंत हा सिनेमा रिलीज होण्याची शक्यता आहे. 'काईटस्' या सिनेमाचे निर्माते राकेश रोशन आहेत तर सिनेमाचं मार्केटिंग मात्र बिग पिक्चर्स करत आहेत. 'काईटस्' ही पहिली जागतिक फिल्म आहे. बिग पिक्चर्स जगभर हा सिनेमा चांगल्या प्रकारे रिलीज करू शकतात, असा विश्वास राकेश रोशन यांनी यावेळी व्यक्त केला.दिग्दर्शक अनुराग बासंूच्या मते, 'काईटस्' ही एक सामान्य लव्ह स्टोरीपेक्षा वेगळी स्टोरी आहे. आपली स्वप्नं साकार करण्यासाठी तिसर्‍या जगातून दोघं जण अमेरिकेत येतात. त्या दोन व्यक्तींची ही कथा आहे.ह्रतिक आणि त्याची मेक्सिकन सह-कलाकार बारबरा मोरी जागतिक मीडियासमोर सहजपणे वावरत होते. आता या दोघांची ऑफस्क्रीन केमेस्ट सिनेमातही जाणवते का ?, हे आपल्याला सिनेमा रिलीज झाल्यावरच लक्षात येईल.

close