अ‍ॅपलने लाँच केला सर्वात मोठा आयफोन

September 10, 2014 3:24 PM0 commentsViews: 3770

10 सप्टेंबर :  आज येणार की उद्या असं म्हणता म्हणता अखेर काल (मंगळवारी) रात्री 10.30च्या सुमारास अ‍ॅपलचा ‘आयफोन-6, ‘आयफोन-6 प्लस’ आणि ‘आय वॉच’ धुमधडाक्यात लाँच केलं आहे. यातल्या आयफोन 6 प्लसची स्क्रीन आतापर्यंतची आयफोनच्या इतिहासातली सगळ्यात मोठी स्क्रीन आहे, तर आयफोन हे दोन्ही फोन्स आतापर्यंतच्या अ‍ॅपलचे सगळ्यात स्लिम फोन आहे. यात 8 मेगापिक्सेलचा कॅमेरा आहे. हे दोन्ही मॉडेल आतापर्यंतच्या आयफोनच्या तुलनेत 50% आणि इतर फोनच्या तुलनेत 25% अधिक वेगवान राहाणार आहेत. अ‍ॅपलने ऍपल वॉच आणि ऍपल पे देखील लाँच केला आहे. कंपनीचे सीईओ टीम कुक यांनी आयफोन सिरीजमधील हे सर्वात आधुनिक मॉडेल असल्याचं म्हटलं आहे.

  • आयफोन 6 ची स्क्रिन

आयफोन 6 ची स्क्रीन 4.7 इंच आणि आयफोन 6 प्लसची स्क्रीन 5.5 इंचाची आहे. या दोन्ही मॉडेल्समध्ये जास्त ड्यूरेबल देण्यात आला आहे. आयफोन-6 ची स्क्रिनची साइज वाढविण्यात आली आहे. यामुळे मोबाईलवर व्हिडिओ पाहाणे आणि इंटरनेट ब्राउजींगची सहज सोपं होणार आहे. तसे यांचे बॉडी डिझाईनही आकर्षक आहे, जे इतर आयफोनपेक्षा याला वेगळे बनवते.

  • मोठा कॅमेरा

आयफोन 6 आणि 6+ मध्ये 8 मेगापिक्सलचा बॅक कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रन्ट कॅमेरा सेल्फीसाठी अपग्रेड करण्यात आला आहे. हे दोन्ही फीचर्स यापूर्वीच्या आयफन्समध्ये नव्हते. याशिवाय यामध्ये चांगल्या क्वालिटीचे फोटो घेण्यासाठी इंटिग्रेटेड ऑप्टिकल इमेज स्टेबेलायझेशनचे ऑप्शनही देण्यात आले आहे. तर टोन एलईडी फ्लॅश व्हर्जनचेही ऑप्शन देण्यात आले आहे.

  • अपग्रेडेड हार्डवेअर आणि सॉफ्टवेयर

आयफोन 6 मध्ये कंपनीने लेटेस्ट ऑपरेटींग सिस्टीम आयओएस 8 दिले आहे. हे ऑप्शनयापूर्वीच्या आयफोनमध्ये नव्हते. जुन्या आयफोनपेक्षा आता आयफोन 6 आणि 6+ अनेक पटीने वेगात चालेल. आयफोन 6 मध्ये 64 बिट ऍपलचे ए8 प्रोसेसर आहे. यात बॅटरी लाईफ वाढवण्यात आली आहे. 3G यूज करताना आयफोन 6 ची बॅटरी 14 तासांपर्यंत चालते, तर आयफोन 6+ ची बॅटरी 24 तास चालते.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close