प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी अमित शहांविरुद्ध चार्जशीट दाखल

September 10, 2014 6:57 PM0 commentsViews: 912

346_amit shah

10 सप्टेंबर :   लोकसभा निवडणुकीदरम्यान प्रक्षोभक भाषण केल्याबद्दल भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरोधात मुझफ्फरनगर पोलिसांनी चार्जशीट दाखल केली आहे. त्यासंबंधीची एक व्हिडिओ क्लिपही पोलीसांना मिळाली आहे. त्याआधारे पोलीसांनी त्यांच्याविरुद्ध चार्जशीट दाखल केली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान, 4 एप्रिल रोजी झालेल्या सभेत शहा यांनी अपमान आणि बदल्याबद्दल बोलले होते.’अपमानाचा बदला घेण्याची तसेच अन्याय करणा-यांना धडा शिकवायची गरज आहे, असे ते म्हणाले होते. लोकसभा निवडणुकीत अमित शहा उत्तर प्रदेशचे प्रभारी होते. निवडणुकीदरम्यान त्यांनी यूपीमध्ये अनेक सभा घेतल्या. प्रक्षोभक भाषण केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाने शहा यांना जाहीर सभा घेण्यावर बंदी घातली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close