राज-उद्धव यांच्या एकीचं आवाहन नाही केलं : मनोहर जोशी

May 18, 2009 5:17 PM0 commentsViews: 3

18 मे मनोहर जोशी यांनी राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचं आवाहन केल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्याचं आवाहन आपण केलंच नव्हतं, असं शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सांगितलंय. मनोहर जोशींची ही कोलांटी उडी तर नाहीना यावर शंका व्यक्त केली जात आहे. शिवसेनेला आणि उद्धव ठाकरेंना मान्य नाही. उद्धव ठाकरेंनी जोशींना याबद्दल फटकारल्याचं समजतं. तसंच यासंबंधी खुलासा करण्यासाठी मनोहर जोशींना सेना भवनावर बोलावण्यात आल्याची माहिती आहे. उद्धव ठाकरेंशी कुठलीही चर्चा न करता मनोहर जोशी यांनी हे आवाहन केलं होतं. शिवसेना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेशी दोन हात करण्याची तयारी करत असताना जोशी सरांनी हा एक प्रकारे अवसान घात केलाय, असं शिवसेनेच्या एका वरीष्ठ नेत्याने आयबीएन लोकमतशी बोलताना सांगितलं.

close