हिंगोलीत आईने दिला चार बाळांना जन्म

September 10, 2014 7:27 PM0 commentsViews: 4037

hingoli 4 Baby

10 सप्टेंबर :   एखाद्या महिलेने जुळ्यांना जरी जन्म दिला तरी तो कौतुकाचा विषय ठरतो, हिंगोलीत मात्र एका महिलेने चक्क चार मुलांना जन्म दिला आहे. 25 वर्षांच्या सुरेखा बोकसे यांनी हिंगोलीच्या माधव हॉस्पिटल मध्ये चार मुलांना जन्म दिला आहे.

ही चारही बाळं सुखरुप असून त्यांचं वजन एक ते दीड किलो आहे. या 4 मुलांमध्ये 2 मुलं आणि 2 मुली आहेत. त्यांना सध्या सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून तिथं त्यांची जास्त काळजी घेण्यासाठी सध्या त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं आहे.

4 मुल जन्माला येणं आणि हे सर्वजण सुखरूप असणं हा एक निसर्गाचा चमत्कार असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. हॉस्पिटलचा खर्च घ्यायचा नाही असं हॉस्पिटलंनी ठरवलं आहे, मात्र सुरेखा यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून या चार मुलांचा आता सांभाळ कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला आहे. दरम्यान मात्र या मुलांना पुढे वाढवण्यासाठी समाजातल्या दानशूरांनी पुढे येण्याचं आवाहन केलं जातं आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close