अडवाणीच भाजपचे विरोधी पक्षनेते – भाजपचा निर्णय

May 18, 2009 5:58 PM0 commentsViews: 2

18 मे लालकृष्ण अडवाणी विरोधी पक्षनेतेपदी कायम राहणार आहेत. भाजपच्या झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या निवडणुकीत एनडीएची झालेली पिछेहाट याची जबाबदारी स्वीकारून अडवाणींनी राजीनामा दिला होता. पण सध्याच्या परिस्थिमध्ये एनडीएला अडवणींसारख्या नेतृत्वाची गरज असल्याचं भाजप नेत्यांचं म्हणणं आहे. त्यासाठीच अडवाणीनी विरोधी पक्षनेतेपद सोडू नये अशी विनंती त्यांना करण्यात आली होती. आणि अडवाणींनी ती मान्य केली.

close