जागा हडपण्यासाठी मायलेकीवर अत्याचार

September 11, 2014 1:01 PM0 commentsViews: 2542

rape-victims-

11 सप्टेंबर : महिलांवरील अत्याचाराच्या घटना दिवसेगणिक वाढत असून अंबरनाथमध्ये जागेच्या वादातून एका मायलेकीवर अत्याचार केल्याची घडना उघडकीस आली आहे. 10 वर्षांच्या मुलीला विवस्त्र करून तिला मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली असून मुलगी आणि तिच्या विधवा आई ज्या घरात राहत होते ती जागा हडपण्यासाठी काही हे घृणास्पद कृत्य केल्याचे समोर आले आहे.

एक महिन्यापूर्वी पीडित मायलेकींच्या राहत्या घराची जागा आणि काही मालमत्ता हडपण्यासाठी सचिन भगत, बबन भगत, प्रवीण पाटील ,मिलिंद कालींदे आणि त्यांच्या साथीदारांनी त्यांच्या घरात घुसून दोघींना बेदम मारहाण करत घरात तोडफोडही केली. भगत गुंडांच्या दहशतीमुळे या पीडित मायलेकींनी आपले राहते घर सोडले असून सध्या त्या दोघीही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शाखेतच राहत आहेत. दुदैर्वी बाब म्हणजे या लहान मुलीने भितीपोटी शाळेत जाणंही बंद केले आहे.

पेशाने वकील असलेल्या या आरोपींची पीडित महिलेने अंबरनाथ पोलिसांकडे तक्रारही केली, पण महिना उलटूनही पोलिसांनी आरोपींवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली. अखेर अप्पर पोलिस आयुक्त आणि राज्य महिला आयोगाच्या हस्तक्षेपानंतर एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. दरम्यान या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close