पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारचा अनोखा फंडा

September 11, 2014 1:20 PM0 commentsViews: 4038

finding-fanny and goad tourism

11 सप्टेंबर : देशविदेशातल्या पर्यटकांना आकर्षित करणार्‍या गोवामध्ये पर्यटनाला चालना देण्यासाठी गोवा सरकारने नवीन शक्कल लढवली आहे. दिपीका पादुकोण आणि अर्जून कपूर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘फाईंडिंग फॅनी’ या चित्रपटासाठी गोवा टुरिझम हे डेस्टिनेशन पार्टनर असणार आहे.

‘फाईंडिंग फॅनी’ या चित्रपटात गोव्यातील फारशी प्रसिद्ध नसलेली ठिकाणंही पहायला मिळणार आहेत. पर्यटकांना या ठिकाणांकडे आकर्षित करण्यासाठी गोवा सरकारने ही नवीन युक्ती लढवली आहे. गोवा आणि बॉलीवूड यांचे नाते नेहमीच जवळचे राहिले आहे. या आधी खामोशी, दिल चाहता है, आशिकी -2 या सारख्या अनेक चित्रपटांचं या आधी गोव्यामध्ये शूट झालं आहे, आणि त्याचा फायदा गोव्याच्या टुरिझमला झाला आहे. आता फायडिंग फॅनी या चित्रपटासाठी गोवा टुरिझम हे डेस्टिनेशन पार्टनर आहे. या माध्यमातून गोव्याच वेगळं रूप पाहायला मिळणार आहे. त्याच बरोबर पर्यटकांनाही आकर्षित करण्यात येणार आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close