जम्मू-काश्मीरमधलं महापुराचं पाणी हळुहळू ओसरायला सुरुवात

September 12, 2014 11:07 AM0 commentsViews: 442

JK Floods Rescue

12 सप्टेंबर :   जम्मू आणि काश्मीरमध्ये आलेल्या महापुराच्या थैमानातून आतापर्यंत 1 लाख 10 हजार लोकांची सुटका करण्यात आली आहे. पण तरीही सुमारे साडे पाच लाख लोक अडकून पडले आहेत.  काही स्थानिकांनी आपली घरं सोडायला नकार दिला आहे. पाऊस थांबल्यानं आता हळुहळू पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, त्यामुळे आता आजारांची भीती निर्माण झाली आहे. 20 हजार लष्कराचे जवान लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करता आहेत. आतापर्यंत पूरग्रस्तांना 800 टनहून जास्त अन्न, पाणी आणि इतर गोष्टींची मदत पूरवण्यात आली आहे. ज्या ठिकाणी पाणी ओसरायला सुरुवात झाली नाही त्या ठिकाणी लष्कर पंपाच्या मदतीनं पाणी काढण्याचा प्रयत्न करत आहेत तर बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन रस्ते बांधणीचं काम युद्धपातळीवर करत आहेत.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close