मनमोहन सिंग राष्ट्रपतींकडे करणार सरकार स्थापनेचा दावा

May 19, 2009 7:59 AM0 commentsViews: 3

19 मे, काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधी यांची काँग्रेस संसदिय दलाच्या प्रमुख म्हणून निवड करण्यात आली. तर मनमोहन सिंग यांचं नाव पंतप्रधान पदासाठी निवडण्यात आलंय. यानंतर आता मनमोहन सिंग नव्या सरकार स्थापनेचा दावा करतील अशी माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. काँग्रेस पक्षाच्या बैठकीनंतर पंतप्रधान राष्ट्रपतींना भेटून सरकार स्थापन करण्यासाठी बोलावण्याची विनंती करतील. राष्ट्रपती प्रतिभा पाटील मनमोहन सिंग यांना साध्या बहुमतासाठी लागणार्‍या 272 खासदारांच्या पाठिंब्याच्या पत्राची मागणी करतील का, याविषयी उत्सुकता आहे. एकीकडे सोनिया गांधी मित्र पक्षांची भेट घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या बैठकीत मंत्रिमंडळ स्थापन करण्याबाबत चर्चा करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे.

close