बसपा 21 खासदारांसह देणार युपीएला बाहेरून पाठिंबा

May 19, 2009 11:12 AM0 commentsViews: 1

19 मे, युपीएला 21 खासदारांसह बाहेरून पाठिंबा देण्याचा निर्णय मायावतींनी घेतला आहे. यातून त्यांना त्यांचा राजकीय स्वार्थ साधायचा आहे. सीबीआयचा ससेमिरा आणि सपाला रोखण्यासाठी काँगे्रसला गरज नसतानाही मायावतींनी बसपा 21 खासदारांसह युपीएला बाहेरून पाठिंबा देण्याची घोषणा केली आहे. समाजवादी पार्टीनंही कालच युपीएला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता त्याधर्तीवर मायावतींनी आजही घोषणा केली. केंद्र सरकार उत्तर प्रदेशला कोणताही विशेष आथिर्क पॅकेज देणार नाही, तसंच देशातल्या गरीबांसाठीही काही करणार नसलं तरीही देशतल्या धर्मांध शक्तींना रोखण्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतला असल्याचं सांगण्यात येत आहे.

close