महाप्रलयानंतर आता साथीच्या आजारांचे सावट

September 12, 2014 10:03 PM0 commentsViews: 368

jamu kashmir flood new12 सप्टेंबर : जम्मू काश्मीरमधल्या भयाण पुरात आतापर्यंत 1 लाख 2 हजारांहून अधिक जणांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलंय. पण, बळींची संख्या दोनशेच्या वर गेली आहे, पण तरीही सुमारे साडे पाच लाख लोक अडकून पडले आहेत. काही स्थानिकांनी आपली घरं सोडायला नकार दिलाय. पाऊस थांबल्यानं आता हळूहळू पाणी ओसरायला सुरुवात झालीय. त्यामुळे आता आजारांची भीती निर्माण झालीय.

जम्मू आणि काश्मीरमध्ये महापुराने थैमान घातलंय. मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पूरस्थितीवर चर्चा करण्यासाठी शनिवारी सर्व पक्षांची बैठक बोलावलीय. पुरात बळी गेलेल्यांच्या वारसांना जम्मू-काश्मीर सरकारनं प्रत्येकी साडे तीन लाखांची मदत जाहीर केली आहे. हज यात्रेसाठीची फ्लाईटही 20 तारखेपर्यंत पुढे ढकलण्यात आलीय. सुप्रीम कोर्टानेही याविषयी चिंता व्यक्त केलीय. तातडीने आणि युद्धपातळीवर मदत पोहचावी, यासाठी केंद्र सरकारने जातीनं लक्ष घालावं, असे निर्देश कोर्टाने दिले आहे. 20 हजार लष्कराचे जवान लोकांची सुटका करण्यासाठी प्रयत्न करत आहे. आतापर्यंत पूरग्रस्तांना 800 टनहून जास्त अन्न, पाणी आणि इतर गोष्टींची मदत करण्यात आलीय. ज्या ठिकाणी पाणी ओसरायला सुरुवात झाली नाही त्या ठिकाणी लष्कर पंपाच्या मदतीनं पाणी काढून टाकतंय. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन रस्ते बांधणीचं काम करतंय. परंतु जम्मू-काश्मीरसमोर साथीच्या रोगांचं संकट उभं ठाकलंय.

पंतप्रधान मोदींचं आवाहन,
जम्मू काश्मीरमध्ये पुरामुळे जो विनाश झालाय तो आपल्यासाठी वेदनादायी आहे. या पुरात अडकलेल्या आपल्या बांधवांना मदतीची गरज आहे. या सर्वांना मदत करण्यासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीत सर्वांनी योगदान देण्याचं मी आवाहन करतो.

हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सवर दगडफेक

महापुरात अडकलेल्या पुरग्रस्तांना धीर आता सुटत चाललायं. त्यामुळे पुरग्रस्तांनी थेट बचावकार्याच्या पथकावर हल्ला चढवला आहे. गेले काही दिवस काश्मीरमध्ये बचावकार्य करताना काही स्थानिक हवाईदलाच्या हेलिकॉप्टर्सवर दगडफेक करत आहे. यामुळे त्यात असणारे जवान आणि बचावलेले लोक यांच्या जीवाला धोका निर्माण होतो. दुसरं म्हणजे, सुदैवानी विमानाला काही झालं नाही, तरी ते विमान संपूर्णपणे तपासण्यात सहा ते सात तास जातात. यामुळे बचावकार्यात तेवढा वेळ अडथळा निर्माण होतो.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close