राष्ट्रवादीशी काडीमोड घेण्याची खासदार विजय दर्डा यांची मागणी

May 19, 2009 11:29 AM0 commentsViews: 2

19 मे, लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला दमदार विजय मिळाल्यानंतर राज्यात राष्ट्रवादीशी आघाडी तोडण्यासंदर्भात काँग्रेसच्या सर्वच नेत्यांचं एकमत होऊ लागलंय. मुख्यमंत्री अशोक चव्हाण, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे, माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख, यांच्यानंतर काँग्रेसचे खासदार विजय दर्डा यांनीही राज्यात काँग्रेसने एकला चलोरे ची भूमिका घ्यावी अशी मागणी सोनिया गांधींना केली आहे. दैनिक लोकमतमध्ये लिहिलेल्या लेखात त्यांनी ही मागणी केली आहे. या लेखात त्यांनी शरद पवार यांच्यावरही अत्यंत कडक शब्दात टीका केली आहे. पवार यांनी विश्वासघातकी राजकारण केल्याची कडक टीका करतानाच राज्यात आता काँग्रेसने विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवाव्यात अशी मागणी त्यांनी यावेळी केली आहे.

close