लक्ष्मण ढोबळेंविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

September 13, 2014 12:40 PM0 commentsViews: 2415

laxaman dhoble13 सप्टेंबर : राष्ट्रवादीचे नेते आणि माजी पाणीपुरवठा मंत्री लक्ष्मण ढोबळे यांच्या विरोधात बोरिवली पोलीस स्टेशनमध्ये बलात्काराचा गुन्हा दाखल झालाय.

ढोबळे यांच्याविरोधात त्यांच्याच नालंदा संस्थेतल्या एका महिला कर्मचार्‍यानं बलात्कार केल्याची तक्रार केली होती. या तक्रारीवरून शुक्रवारी मध्यरात्री हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

ढोबळे यांची बोरीवलीमध्ये नालंदा नावाची संस्था आहे. या संस्थेत ही महिला काम करते. आपल्यावर 2011-13 या दरम्यान ढोबळे यांनी अनेकदा बलात्कार केला, अशी तक्रार या महिलेनं केली. मात्र ढोबळे यांनी सर्व आरोप फेटाळून लावले आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close