‘मुंडेंच्या मृत्यूचं राजकारण करू नका, तपासावर समाधानी’

September 13, 2014 12:53 PM0 commentsViews: 2643

 pankaja_news13 सप्टेंबर : गोपीनाथ मुंडेच्या मृत्यूची सीबीआय चौकशी सुरू आहे आणि मी त्या चौकशीवर समाधानी आहे असं भाजपच्या आमदार पंकजा मुंडेंनी स्पष्ट केलंय. त्यामुळे मुंडेंच्या मृत्यूचं राजकारण करून विरोधीपक्षांनी तपासाबद्दल लोकांची दिशाभूल करू नये असं आवाहनही पंकजा मुंडेंनी केलंय.

पंकजा मुंडे यांची संघर्षयात्रा सुरू आहे. त्यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. तसंच माझा कल हा विधानसभा लढवण्याकडे आहे. पण सहकार्यांशी चर्चा करून लोकसभा लढवायची की नाही ते ठरवणार असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्यात.

राज्यात 15 ऑक्टोबरला मतदान होतंय. त्याचवेळी बीडची पोटनिवडणूकही पार पडणार आहे. यावर पंकजा मुंडेंनी ही प्रतिक्रिया दिलीय.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close