राज्यसभेवर येण्यासाठी आठवलेंची काँग्रेसकडे फिल्डिंग

May 19, 2009 2:00 PM0 commentsViews: 9

19 मे, शिर्डीतल्या पराभवानंतर काँग्रेसने आपल्याला राज्यसभेवर पाठवावं, असा रिपब्लिकन नेते रामदास आठवले यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी रिपब्लिकन कार्यकर्ते आंदोलन करताहेत. पण आठवलेंची ही मागणी काँग्रेसने मान्य केली, तर विलासराव देशमुखांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागण्याची शक्यता मावळते. काँग्रेस राज्यसभेच्या एका जागेवरुन कशा प्रकारचं राजकारण खेळलं जातंय याचा आयबीएन लोकमतने स्पेशल रिपार्ट तयार केला आहे. रामदास आठवलेंना शिर्डीतला पराभव जिव्हारी लागल्याचं समजतंय.काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मिळून आपला पराभव केला निवडून आलो असतो तर मंत्री झालो असतो, स्थानिक राजकारणात ढवळाढवळ केली असती अशी भिती काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांना वाटली. त्यामुळेच त्यांनी आपला पराभव केला, असा आरोप आठवले यांनी केला आहे.त्यामुळे त्यांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरुन उग्र निदर्शन करायला लागली आहेत. कुठे पुतळे जाळले जाता आहेत तर कुठ दगडफेक केली जातेय. हे सर्व रामदास आठवले यांना काँग्रेसनं न्याय द्यावा यासाठी होतय. पण ज्यांच्यावर आठवलेच्या पराभवाचं खापर फोडलं जातंय त्यांना मात्र यामागे दुसर्‍या कोणाच हात असल्याची शंका येतआहे.आठवले यांचा बोलविता धनी कुणी वेगळाच आहे अशी शंका राधाकृष्ण विखे पाटील यांना आहे. विखे पाटलांचा रोख राष्ट्रवादीवर आहे. राष्ट्रवादीच्या इशार्‍यावरुन आकांडतांडव करत आठवले यांनी काँग्रेसकडून राज्य सभेची जागा मिळवली तर विलासराव देशमुखांसारख्या खासदार नसलेल्या माजी मुख्यमंत्र्याला राज्यातून राज्यसभेवर जाता येणार नाही. बाहेरच्या राज्यातून राज्य सभेवर जाण विलासराव आणि पक्षाला खचितच रुचणार नाही. हा विचार केला तर विलासराव देशमुख यांची केंद्रीय मंत्रीमंडळात वर्णी लागणं कठीण आहे. राष्ट्रवादीने हाच विचार केल्याचं दिसतंय. राष्ट्रवादीबरोबरच मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनाही विलासरावांची अडवणूक करायची असं दिसतंय. म्हणुनच दलित मतांसाठी आठवलेंच पुनर्वसन करण गरजेच आहे असा आग्रह चव्हाणांनी पक्ष श्रेष्ठींकड धरलाय. थोडक्यात काय रामदास आठवलेंच्या निमित्ताने शरद पवार आणि अशोक चव्हाण या दोघानींही विलासरावांना चांगलंच कोंडीत पकडलं आहे.

close