गडकरी वाचाळांचे सम्राट, आबांचा पलटवार

September 13, 2014 10:35 PM0 commentsViews: 1332

13 सप्टेंबर : वाचाळपणाच्या बाबतीत जर ते टीका करत असेल तर गडकरींनी स्वत: ला तपासलं पाहिजे मला जर वाचाळ म्हणत असतील तर ते वाचाळांचे सम्राट शोभतील असं सडेतोड उत्तर गृहमंत्री आर.आर.पाटील यांनी दिलं.

तसंच आज जर राष्ट्रवादीला जातीवादी समजत असतील तर भाजपने एकदा तपासून पाहिलं पाहिजे. यांच्या भूमिकेमुळे एकदा देश तुटला होता. जात जात राहिली नाही धर्म धर्म राहिला नाही. संघाची ही नेहमीची भूमिका असते असंही आबा म्हणाले. सिंचन खात्यातील घोटाळ्याचा आरोप आमच्यावर करताय पण आज ज्यांना प्रवेश दिलाय त्या अजित घोरपडे यांनाच काय ते विचारावे असा टोलाही आबांनी लगावला. सांगलीत झालेल्या सभेत नितीन गडकरींनी पाटील यांच्यावर वाचाळ असल्याची टीका केली होती.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

close